Mumbai Best-Bus Ticket Fare Hike: मुंबईत सर्वसामान्यांचा प्रवास महागला; बेस्ट बसच्या तिकीट दरात होणार वाढ
Photo Credit -X

Mumbai Best-Bus Ticket Fare Hike : बसचे किमान तिकीट दर आता 5 रुपयांवरुन 7 रुपये होणार आहेत. ही दर वाढ एसी बसच्या तिकीट दरांमध्ये होणार (Best Ticket Fare Hike) आहे. एसी बससाठी 10 किलो मीटर मागे 3 रुपयांनी तिकीटांचे दर महागणार आहेत. मोठ्या संख्येने मुंबईकर बेस्ट बसचा वाहतूकीसाठी वापर करतात. आता वाहतूकीचा खर्च आणखी वाढल्याने (transportation cost increased)मुंबई करांचा त्यासाठी काय प्रतिसाद राहील हे पहावं लागले.  (हेही वाचा :Best Bus Fare: बेस्ट मधून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री, जाणून घ्या वाढीव दर )

मिळालेल्या माहितीनुसार, किमान तिकीट दर आता 5 रुपयांवरुन 7 रुपये होणार आहेत. एसी बसचेही तिकीट दर वाढणार आहेत. एसी बससाठी 10 किमीमागे 3 रुपयांनी तिकीटांचे दर महागणार आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईत आता बसच्या तिकीट दरवाढीची भर पडणार आहे.

आदित्य ठाकरेंचे एक्सवर ट्वीट

तिकीटाचे दर वाढणार असल्याने आदित्य ठाकरेंनी एक्सवर ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. "येथील भाजपच्या नेतृत्वाखालील 'मिंधे' असलेल्या सरकारने बेस्टच्या बस भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. भाजप हे मुंबईविरोधी असल्याचे आम्ही नेहमीच म्हणत आलो आणि ही प्रस्तावित भाडेवाढ हा मुंबईकरांचा खिसा कापण्याचा आणखी एक मार्ग आहे."

"प्रथमत: बसेसची संख्या कमी करण्यात आली आहे. बस थांब्यांचे रूपांतर कंत्राटदारांच्या जाहिरात फलकांमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे भाडेवाढ का?", असा सवाल आदित्य ठाकरेंनी ट्वीटमधून विचारला आहे.

"आम्ही भाडे जगातील सर्वात परवडणारे असावे म्हणून ठेवले होते आणि तरीही आम्ही 10,000 इलेक्ट्रिक बसेसचा ताफा वाढवत आहोत. मुंबईविरोधी असलेल्या भाजपच्या राजवटीत भाडे वाढवून बसेस कमी करून मुंबईकरांचे हाल होत आहेत." अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे.