मुंबईतील वांद्रे (Bandra) रेल्वे स्टेशनवरील एका दुकानात अन्नपदार्थात उंदीर मिळाला असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर दुकानचालकाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
वांद्रे स्टेशनवरील फलाट क्रमांक 2 येथील परमार चना सिंग याचा खाद्यपदार्थांचा स्टॉल आहे. येथे चॉकलेट, भेळ आणि पाण्याच्या बॉटल ठेवलेल्या काचेच्या बॉक्समध्ये उंदीर दिसून आला. तर उंदीर या काचेच्या बॉक्समधून बाहेर येण्यासाठी धडपड करत होता. या बद्दलचा व्हिडिओ एका प्रवाशाने त्याच्या मोबाईलमध्ये शूट करुन पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयात दाखवला. याप्रकरणी सिंग ह्याला रेल्वे प्रशासनाने 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.(हेही वाचा-रेल्वे स्थानकांवर खुल्या पद्धतीने लिंबू सरबत विकण्यास बंदी, मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय)
पहा व्हिडिओ:
तर अशा पद्धतीचे अन्नपदार्थ प्रवाशांना खाण्यासाठी देत असल्याने त्याच्यावर कारवाई करावी असे सामाजिक कार्यकर्ते मन्सूर दरवेश यांनी केला आहे. तसेच प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळण्याचे आता तरी थांबवा असे सुद्धा त्याला सांगण्यात आले आहे.