मुंबईत काही दिवसांपूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकावर लिंबू सरबत विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओतील व्यक्ती अत्यंत घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवत असताना दिसून आल्याने लोकांनी त्याच्या विरुद्ध संपात व्यक्त करत आहेत. मात्र रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या लिंबू सरबताचा दर्जा उत्तमच असेल यावरुन प्रश्न उपस्थित राहत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर मिळणारे लिंबू सरबत, ज्यूस, काला खट्टा यांची खुल्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी असा निर्णय मध्य रेल्वेप्रशासनाने घेतला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन या निर्णयाची अंबलबजावणी करण्यात आली असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. परंतु कुर्ला स्थानकातील लिंबू सरबताचा प्रकार अत्यंत वाईट असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणि खाद्यपदार्थांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.(हेही वाचा-Video: रेल्वे स्थानकावर लिंबू पाणी बनवण्याचा किळसवाणा प्रकार; दुकानदारावर कारवाई)
रेल्वे स्थानावर 2013 रोजी पासू ज्यूसची विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी विक्रेत्यांना ज्यूस संदर्भातील सर्व बाबींची अट पूर्ण केल्यानंतरच परवाना देण्यात आले होते. मात्र सध्या या सर्व अटींची पायमल्ली विक्रेत्यांकडून करण्यात येत असल्याने मध्य रेल्वेने यासाठी कठोर पाऊल उचलले आहे.