Attacks on Cats in Bandra West: वांद्रे परिसरात 6 मांजरींवर अज्ञातांकडून गंभीर हल्ले; माहिती देणार्‍यास 50 हजारांचे बक्षीस जाहीर
Cats| Photo Used For Representational Purpose Only| Pixabay.com

मुंबई मध्ये वांद्रे पश्चिम (Bandra West) भागात मागील काही दिवसांमध्ये मांजरींवर (Cats)  गंभीर हल्ले होत असल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये 3 मांजरींचा या काही दिवसांत मृत्यू झाला असून काहींच्या जबड्याजवळ इतक्या गंभीर जखमा झाल्या आहेत की त्या काहीच खाऊ शकत नाही अशा अवस्थेमधे आहेत. दरम्यान या क्रुर घटनेचा प्राणीमित्र संघटनांनी निषेध करत हे हल्ले करणार्‍या व्यक्तीचा ठावठिकाणा देणार्‍या व्यक्तीला, त्यांना शोधण्यात मदत करणार्‍यांना 50 हजार रूपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान मांजरींवरील हल्ल्यांच्या या घटना वांद्रे पश्चिम येथील चिमबाई रोड आणि पेरी क्रॉस रोड या भागातील आहेत. या गंभीर हल्ल्यांप्रकरणी स्थानिक पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. Bombay Animal Rights चे विजय मोहनानी यांनी TOIला दिलेल्या महितीनुसार, 'या मांजरींना मारताना काही धारदार वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. ज्या सध्या जिवंत आहेत त्यांना अशा अवस्थेमध्ये पाहताना खूप त्रास होत आहे. कुणीतरी प्राणी द्वेष्टा गल्ली बोळ्यातून फिरताना असे हल्ले करत असावा.' Bombay Animal Rights कडून या हल्ल्यांमागे असणार्‍याला पकडण्यासाठी रोख रक्कमेचं बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नक्की वाचा: लज्जास्पद! केवळ नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळले, यवतमाळमधील क्रूर घटना.

मदतीचं आव्हान करणारं ट्वीट

Dr Jyotsna Changrani या प्राणीप्रेमींनी टाईम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पोलिसांना या हल्ल्यांमागे नेमकं कोण आहे हे शोधण्यासाठी विविध ठिकाणंचं सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचेही आवाहन केले आहे. मात्र यासोबतीने नागरिकांनीही सजग राहून या मांजरींवर हल्ले करणार्‍यांची माहिती देण्याचं आवाहन केले आहे.