मुंबई: बॉलिवूड हिरोईन व्हायचं स्वप्न अर्ध राहिल्याने तरुणीने केली आत्महत्या, ओशिवरा येथील धक्कादायक घटना
Representational Image | (Photo Credits: ANI)

बॉलिवूडचं (Bollywood)  माहेरघर अशी ओळख असलेल्या मुंबईच्या मायानगरीत अनेकजण हिरो- हिरोईन बनण्याचं स्वप्न उरी बाळगून येत असतात. यातील काहींचं नशीब एकाच फटक्यात चमकून जातं, तर काहींना कितीही वर्ष काम करून पुरेसं यश मिळत नाही. या स्ट्रगलिंगच्या नैराश्यापायी अनेकांनी मृत्यूला देखील जवळ केल्याच्या घटना आपण ऐकून असाल, असाच काहीसा प्रकार काल मुंबईतील उच्चभ्रू अशा ओशिवरा (Oshiwara) येथील लोखंडवाला (Lokhandwala) रहिवाशी संकुलात घडला. केन वूड सोसायटीतील हिरोईन होऊ इच्छिणाऱ्या एका तरुणीने काम न मिळण्याच्या निराशेतून बिल्डिंगच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, या तरुणीचे नाव पर्ल पंजाबी (Pearl Punjabi) असे असून ती मागील काही वर्षांपासून बॉलिवूड मध्ये काम करण्यासाठी प्रयत्न करत होती, मात्र वारंवार पदरी अपयश आल्याने तिने काल, 29 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आपले प्राण संपवले. (आत्महत्या करण्यासाठी व्यक्ती का प्रवृत्त होतो? तत्पूर्वी 'या' काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा)

ANI ट्विट

पोलिसांच्या माहितीनुसार, पर्ल पंजाबी ही मानसिक आजारांनी त्रस्त होती. काम न मिळण्याची अवस्था तिच्या अडचणी आणखीनच वाढवत होत्या. आपला उदरनिर्वाहासाठी टी एका खाजगी कंपनीत काम करत होती, मात्र साहजिकच इथे तिला रस नसल्याने कामात लक्ष लागत नव्हते. दुसरीकडे सतत प्रयत्न करत असतानाही बॉलिवूडमध्ये तिच्या हाती यश लागत नव्हते. यावरून अनेकदा तिची आपल्या आईसोबत भांडण देखील व्हायची. यामुळे याआधी तिने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 29 ऑगस्ट रोजी सुद्धा काहीश्या कारणावरून तिचे कुटुंबात भांडण झाले या अस्वस्थ अवस्थेत तिने इमारतीच्या गच्चीवर जाऊन उडी मारली.  , गंभीर जखमी झालेल्या पर्लला इमारतीतील रहिवाशांनी तात्काळ लगतच्या कोकिलाबेन इस्पितळात दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले(मुंबई : बाल कलाकार ठरली एकतर्फी प्रेमाची शिकार, हिरानंदानी रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास, (वाचा सविस्तर)

दरम्यान,  एका अन्य प्रसंगात काल, दहिसर येथील एका २० वर्षीय विद्यार्थ्याने सुद्धा इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आपली आयुष्य संपवले आहे. संबंधित विद्यार्थी हा प्रथमी वर्षाचे पदवी शिक्षण घेत होता, मागील वर्षी काहीश्या आजाराने त्याला त्याची बहीण गमवावी लागली होती. या दोन्ही प्रकरणात पोलीस सध्या कसून तपास करत आहेत.