Arrest | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

Mumbai: बॉलिवूड मधील दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणात ड्रग्जचा खुलासा झाल्यानंतर एनसीबी (NCB)कडून दिवसागणिक या संबंधित अधिक तपास केला जात आहे. तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज ही जप्त करण्यात आल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या मध्ये बॉलिवूड मधील कलाकार ते ड्रग्ज सप्लायर्स यांच्या नावाचा ही खुलासा झाला आहे. याच पार्श्वभुमीवर 9 डिसेंबरला मुंबईतील अंधेरी पश्चिम येथून कोकेन या अंमली पदार्थाची 16 पाकिटे एनसीबीकडून जप्त करण्यात आली आहेत.(Drugs Case: ड्रग्ज प्रकरणी 58 कोटी रुपयांचे Mephedrone जप्त, महाराष्ट्रातील ATS कडून 13 जणांना अटक)

दरम्यान याआधी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 34 वर्षीय गिनी  एननागरिकाकडून 2.935 किलोच्या कोकेनची तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत तब्बल 18 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.