Drugs Case: कॉमेडियन भारती सिंह हिला NCB कडून अटक, ड्रग्ज प्रकरणी छापेमारी केल्यानंतर केला मोठा खुलासा
Bharti Singh (Photo Credits-Twitter)

Drugs Case:  टेलिव्हिजन वरील कॉमेडी शोज मधून झळकणारी अभिनेत्री भारती (Bharti Singh) सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांच्या घरी आज एनसीबीने (NCB) ड्रग्ज प्रकरणी छापेमारी केली. त्यानंतर या दोघांना एनसीबीच्या ऑफिसात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या चौकशीनंतर आता असे समोर आले आहे की, भारती हिला अटक करण्यात आली आहे. तर हर्ष याची एनसीबीकडून अद्याप चौकशी केली जात आहे. या प्रकरणी एक मोठा खुलासा सुद्धा तिने केला आहे.(Comedian Bharti Singh च्या मुंबई मधील घरात Narcotics Control Bureau च्या टीमची छापेमारी)

एनसीबीकडून आज भारती हिच्या प्रोडक्शन ऑफिस आणि घरातून 86.5 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांनी आम्ही गांजाचे सेवन केल्याचे भारती आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांनी कबुल केले आहे. यामध्ये आता भारती हिला ताब्यात घेण्यात आल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे.(Karishma Prakash Summoned: अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरी छापेमारी दरम्यान सापडले ड्रग्ज)

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत बहुतांश बॉलिवूड कलाकारांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची नावे समोर आली आहेत. बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणी एनसीबी आता सातत्याने अधिक तपास करत असून यामध्ये काही नवी नावे सुद्धा समोर येत आहेत.