Drugs Case: कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष लिंबाचिया पोहचले NCB कार्यालयात, ड्रग्ज प्रकरणी होणार चौकशी
Bharti Singh at NCB Office (Photo Credits-ANI)

Drugs Case: कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh)  आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांना एनसीबीकडून (NCB) ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. त्यानुसार ते दोघे आता एनसीबी कार्यालयात पोहचले असून त्यांची ड्रग्ज प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. तर आज एनसीबीकडून या दोघांच्या घरी धाड टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीकडून सातत्याने त्या संबंधित तपास करत आहे. यामध्ये काही मोठे खुलासे सुद्धा झाले आहेत.(Drug Case: अभिनेता अर्जुन रामपाल याचा मित्र Paul Bartel याला ड्रग्ज संबंधित प्रकरणात NCB कडून अटक)

कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष लिंबाचिया नेहमीच त्यांच्या कॉमेडी शोज च्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येतात. मात्र आज एनसीबीकडून त्यांच्या घरावर छापेमारी केली असता चाहत्यांना धक्का बसला असून त्यांच्या सुद्धा भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत बहुतांश बॉलिवूड कलाकारांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची नावे समोर आली आहेत. बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणी एनसीबी आता सातत्याने अधिक तपास करत असून यामध्ये काही नवी नावे सुद्धा समोर येत आहेत.