Comedian Bharti Singh च्या मुंबई मधील घरात Narcotics Control Bureau च्या टीमची छापेमारी
Comedian Bharti Singh

बॉलिवूड मधील ड्रग्ज कनेक्शनमध्ये धागेदोरे शोधण्यासाठी एनसीबीच्या टीम्स मागील काही महिन्यांपासून काम करत आहेत. अशामध्ये आज (21 नोव्हेंबर) प्रसिद्ध हिंदी कॉमेडियन भारती (comedian Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया यांच्या घरी देखील नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो च्या टीम दाखल झाल्या आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीने अंधेरी, लोखंडवाला, वर्सोवा भागातील 3 विविध ठिकाणी छापे मारले आहेत. Bollywood Drugs Case: ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल याची तब्बल 7 तास चौकशी; एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडताच दिली 'अशी' प्रतिक्रिया

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांची अटक झाली. त्यानंतर बॉलिवूड क्षेत्रातील अनेक मोठे कलाकार एनसीबीच्या रडारवर आले आहेत. सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, दीपिका पदुकोण या बड्या अभिनेत्रींची एनसीबी कार्यालयात चौकशी झाली. तर काहींच्या घरी एनसीबीने छापे टाकत चौकशी सुरू केली आहे.

ANI Tweet

दरम्यान जून 2020 मध्ये सुशांतचा मृत्यू झाला. सीबीआय सह 3 केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणी विविध तपास आणि चौकशी करत आहेत. अद्याप सीबीआयच्या हातात कोनताच ठोस पुरावा लागलेला नाही. मात्र बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक कलाकारांची नावं पुढे येत आहेत.