सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज अँगल समोर आला. त्यानंतर, नारकोटिक्स कन्ट्रोल ब्युरोदेखील (NCB) या प्रकरणाच्या तपासात गुंतली आहे. एनसीबीने आतापर्यंत बॉलिवूडमधील कलाकार, चित्रपट निर्मात्यांसह बऱ्याच जणांची चौकशी केली गेली आहे. याप्रकरणी बॉलिवूड कलाकार अर्जुन रामपाल (Arjun Rampal) यालाही एसबीने समन्स बजावले होते. त्यानुसार आज अर्जुन रामपाल याचीही एनसीबीने चौकशी केली आहे. तब्बल 7 तासाच्या चौकशीनंतर त्याची सुटका झाली आहे. एनसीबी कार्यालयातून बाहेर पडल्यावर अर्जुन रामपालने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नाही. एनसीबीने फोन केला होता, म्हणून तो येथे आलो होतो, असे तो म्हणाला आहे.
ड्रग्ज प्रकरणी समन्स मिळाल्यानंतर अभिनेता अर्जुन रामपाल चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाला होता. अर्जुन रामपाल यांची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिची एनसीबीने दोनवेळा चौकशी केली. यावेळी अभिनेता अर्जुन रामपाल यालाही चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. अर्जुन रामपालला शुक्रवारी सकाळी दहा वाजता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. हे देखील वाचा- Vijay Raaz: 23 वर्षांचे करीअर पणाला लागलंय, अभिनेता विजय राझ यांनी विनयभंग प्रकरणी सौडले मौन
एएनआयचे ट्विट-
Maharashtra: Actor Arjun Rampal leaves from Narcotics Control Bureau (NCB) office in Mumbai. https://t.co/fAFYmvaaoE pic.twitter.com/JXSQ4jdh68
— ANI (@ANI) November 13, 2020
एनसीबीने आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत रिया चक्रवर्ती यांच्यासह सुमारे 28 जणांना ताब्यात घेतले आहे. जवळपास महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर रियाची जामिनावर सुटका झाली. पण तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती अजूनही तुरुंगात आहे. शौविकने न्यायालयात नवीन जामीन अर्ज दाखल केला असून, त्यावर अद्याप सुनावणी झाली नाही.