Vijay Raaz | (File Image)

अभिनेता विजय राझ (Actor Vijay Raaz) यांनी त्यांच्यावर झालेल्या विनयभंग (Molestation ) आणि छेडछाडीच्या आरोपावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता विजय राझ ( Vijay Raaz) यांनी म्हटले आहे की, या इंडस्ट्रीमध्ये मी गेली 23 वर्षे काम करतो. मोठ्या कष्टाने मी माझे करिअर उभा केले आहे. हे करीअर डावावर लागले आहे. या आरोपात माझे करीअर बर्बाद होऊ शकते. त्यामुळे कोणी ओरोप केला की लगेच तुम्ही आरोप मान्य करणार? मी असा प्रकारचा गुन्हेगार आहे म्हणून? अनेकदा लोक मूळ मुद्द्याची दुसरी बाजू ऐकूण घेण्यापूर्वीच लोक आपले मत ठरवून टाकत असतात. असं होणं हे फार गंभीर आहे.

विजय राझ यांनी बॉम्बे टाइम्सशी बोलताना सांगितले की, महिला सुरक्षा ही सर्वात म्हहत्त्वाची जाबाबदारी आहे. मला स्वत:ला एक 21 वर्षांची मुलगी आहे. त्यामुळे ही जबाबदारी मी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. मी प्रत्येक चौकशीला सामोरे जायला तयार आहे. परंतू कोणत्याही कारणाशीवाय मला माझ्या आगामी चित्रपटातून निलंबीत केले जाणे हे धक्कादायक आहे. (हेही वाचा, Actor Vijay Raaz Arrested in Gondia: बॉलिवूड अभिनेता विजय राझ यांना गोंदिया पोलिसांकडून अटक; महिलेचा विनयभंग केल्याचे प्रकरण)

पुढे बोलताना विजय राझ यांनी सांगितले की, अटक प्रकरणानंतर मी लगेच मुंबईला आलो. त्यानंतर 3 नोव्हेंबरला मला एबंदांतिया एंटरटेनमेंट प्राइवेट लिमिटेड यांच्याकडून एक ईमेल आला. ज्यात या तक्रारीमुळे मला या चित्रपटातून अनिश्चित काळासाठी निलंबीत करण्यात आल्याचे म्हटले. चित्रपट निर्मात्याने एक अंतर्गत तक्रार समिती (आयसीसी) गठीत केली आहे. ही समिती त्यांच्यावर लागलेल्या आरोपांची चौकशी करेल. अभिनेता विजय राझ यांनी आतापर्यंत या प्रकरणावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. प्रदीर्घ काळानंतर त्यांनी आपले मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असेही प्रकाश राझ यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

'शेरणी' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवरील एका महिला सदस्याने त्यांच्यावर विनयभंग आणि छेडछाड केल्याचा आरोप केला होता. या आरोपात दाखल झालेल्या तक्रारीवरु विजय राझ यांना अटकही झाली होती. शेरणी चित्रपटाचे चित्रीकरण मध्य प्रदेश येथील बालाघाट येथे सुरु होते. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान, विजय राज यांना विनंयभंगाच्या आरोपाखाली पोलिसांनी 2 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने विजय राज यांची जामिनावर सुटका केली होती.