Drug Case: अभिनेता अर्जुन रामपाल याचा मित्र Paul Bartel याला ड्रग्ज संबंधित प्रकरणात NCB कडून अटक

Drug Case: अभिनेता अर्जुन रामपाल याचा मित्र Paul Bartel याला ड्रग्ज संबंधित प्रकरणात NCB कडून अटक
Arrest. Representational Image. (Photo Credit: ANI)

बॉलिवूड मधील अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाला ड्रग्जचे वळण लागल्याने नवे खुलासे होत गेले. याच पार्श्वभुमीवर ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड मधील काही कलाकारांची सुद्धा धरपकड करण्यासह चौकशी सुद्धा केली गेली. तर आता अभिनेता अर्जुन रामपाल याचा मित्र पॉल बार्टेल (Paul Bartel) याला एनसीबीने ड्रग्ज संबंधित प्रकरणात अटक केली आहे. तर काल अर्जुन रामपाल याची गर्लफ्रेंड गेब्रिएल हिला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तसेच अर्जुन याला सुद्धा एनसीबीकडून समन्स पाठवण्यात आले आहेत. तर त्याला आज चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.(Karishma Prakash Summoned: अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरी छापेमारी दरम्यान सापडले ड्रग्ज; NCB ने बजावला समन्स)

तर गेब्रिएल हिची एनसीबीकडून जवळजवळ 6 तास चौकशी करण्यात आली. यावेळी तिचा भाऊ अगिसिलाओस याच्या ड्रग्ज संबंधित प्रश्न सुद्धा विचारले गेले. ऐवढेच नाही तर एनसीबीकडून ड्रग्ज प्रकरणाचा चांगलाच तपास केला जात असून बड्या कलाकारांची नावे सुद्धा यामध्ये समोर आल्याचे दिसून आले आहे.(Showik Chakraborty Files Bail Application: रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक याने मुंबईतील NDPS कोर्टात दाखल केला जामिन अर्ज)

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एनसीबीकडून अर्जुन रामपाल याच्या मुंबईतील स्थित घरावर छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्या घरातून बॅन मेडिसन जप्त करण्यात आले होते. जे NDPS कायद्याअंतर्गत येतात. त्याच कारणास्तव त्याची गर्लफ्रेंड गेब्रिएल हिची चौकशी करण्यात आली. दुसऱ्या बाजूला दीपिका पादुकोण हिची मॅनेजर करिश्मा हिची सुद्धा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एनसीबीकडून चौकशी केली जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2020 10:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).