Showik Chakraborty Files Bail Application: रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक याने मुंबईतील NDPS कोर्टात दाखल केला जामिन अर्ज
शोविक याचे वकिल सतीश मानशिंदे यांनी कोर्टात जामिन अर्ज दाखल करत असे म्हटले की, नार्कोटिक्स विभागाला कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज मिळाले नव्हते. फक्त संबंधित विधानांच्या आधारावर त्याला अटक केली गेली होती
Showik Chakraborty Files Bail Application: सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूप्रकरणाला ड्रग्जचे वळण लागल्याने याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली गेली. तर यामध्ये सामील असलेल्या रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिचा भाऊ शोविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) हिने आज मुंबईतील एनडीपीएस कोर्टात (Special NDPS Court) आपल्या जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये शोविक याने त्याला लवकरात लवकर जामिन द्यावा असे म्हटले आहे.
शोविक याचे वकिल सतीश मानशिंदे यांनी कोर्टात जामिन अर्ज दाखल करत असे म्हटले की, नार्कोटिक्स विभागाला कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज मिळाले नव्हते. फक्त संबंधित विधानांच्या आधारावर त्याला अटक केली गेली होती. हेदेखील वाचा- Rhea Chakraborty Bail Update: रिया चक्रवर्ती, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा ला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Showik Chakraborty, brother of Rhea Chakraborty files fresh bail application in Special NDPS Court. #Mumbai
— ANI (@ANI) November 7, 2020
दरम्यान, शोविक याला एनसीबीकडून मुंबईतून येत्या 4 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेनंतर त्याचे वकिल बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने त्याचा जामिन अर्ज फेटाळून लावला होता. त्याचसोबत स्पेशल कोर्टाने सुद्धा त्याचा जामिन अर्ज मंजूर केला नाही.
नारकोटिक्स विभागाच्या तपासात असे समोर आले होते की, शोविक याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सुरु असलेल्या चौकशीत बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट देखील समोर आले. त्यात शोविक ची बहिण रिया चक्रवर्ती आणि शोविक कडून बरीच माहिती मिळाली होती. यात महिन्याभरापूर्वी रियाला जामीन मंजूर झाला होता. मात्र तिचा भाऊ शोविकला मात्र जामिन मिळाला नव्हता.
(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2020 01:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

