Maharashtra Monsoon Update: मुंबई, कोकणासह राज्यात अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस, पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता- IMD
Maharashtra Monsoon 2020 | Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

महाराष्ट्रात मुंबई (Mumbai), ठाणे Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), रायगड (Raigad), कोकणासह (Konkan) अनेक जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पावसाचा हा जोर आजही कायम असून मुंबईतील भांडूप (Bhandup), मुलूंड (Mulund) परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र मुंबईतील अनेक भागात पावसाचा हा जोर पुढील काही तासांसाठी कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मागील 2-3 तासांत 40-70 MM पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई-रायगड भागात मागील काही तासांत विजेच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस सुरु होता. हवामान विभागाच्या दामिनी सिस्टमने याची नोंद केली आहे. यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा- Maharashtra Weather Update: मुंबईसह नाशिक, जुन्नरमध्ये काही वेळापुरता ढगांचा गडगडाट होणार मात्र पावसाची धुसर शक्यता- IMD

कोकणातही मागील काही तासांत जोरदार पाऊस झाला असून पुढील 3-4 तासांसाठी हा जोर कायम राहणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, काल अहमदनगर, औरंगाबाद, सांगली, सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. या पावसात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वीज कोसळून एक गाय आणि बैलाचा मृत्यू झाला. ही घटना गुंजाळवाडी पठार परिसरात घडली. याशिवाय अनेक ठिकाणी दमदार पावसामुळे वाहने पाण्याखाली गेली. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. 6 सप्टेंबर पासून पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तर मुंबईत कोरडे वातावरण अनुभवायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.