Mumbai International Airport आज 6 तास देखभाल, डागडुजीच्या कामांसाठी राहणार बंद
Chhatrapati Shivaji Maharaj International Airport | (Photo Credit - Twitter/ANI)

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (Mumbai  International Airport) वर आज (17 ऑक्टोबर) 6 तास वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर रन वे वर देखभालीच्या कामासाठी आज ही विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA)च्या प्रशासनाकडून जारी परिपत्रकामध्ये आज विमानतळ सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सहा तासांसाठी विमानतळ बंद ठेवलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या सहा तासांमध्ये RWY 09/27 आणि  RWY 14/32 या दोन रनवे वर देखभाल, डागडुजीची कामं केली जाणार आहेत. संध्याकाळी 5 नंतर पुन्हा विमानतळ सुरळीत सुरू केले जाणार आहे.

CSMIA ने माहिती देताना यामुळे कोणतीही विमानं उशिराने धावतील असं होणार नसल्याचं म्हटलं आहे. आजच्या कामासाठी वेळ राखूनच पूर्वी तिकीटं आयोजित करण्यात आली होती. Air traffic control (ATC) आणि Airside operations यांना विश्वासात घेऊनच ही कामं केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान एअरपोर्ट प्रशासनाने आपल्याला प्रवाशांकडून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे. प्रवाशांची प्रार्थमिकता लक्षात घेऊन हे काम हाती घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Mumbai Plane Crash New Video: विमान कोसळतानाचा मुंबईतील दुर्घटनेचा नवा व्हिडिओ व्हायरल .

दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मंगळवारपासून या महिन्यात व्यस्त असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तासभर रोडब्लॉक लागू करणार असल्याचे सांगितले आहे. या कारवाईचा महामार्गावरील वाहनांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

17 ते 19 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबर रोजी महामार्गालगतच्या विविध ठिकाणी दररोज दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत हे रोडब्लॉक लागू केले जातील, असे अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.