Sandeep Deshpande | (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाचे नेते आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे निकटवर्तीय संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. मुंबई येथील शिवाजी पार्ग येथे मॉर्निक वॉक करण्यासाठी गेलेल्या देशपांडे यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांची ओळख पटली नाही. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असावा असे बोलले जात आहे. देशपांडे यांना सध्या हिंदूजा रुग्णालात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मनसेकडून तातडीने निशेध करण्यात आला आहे.

मनसे नेते संतोष धुरी यांनी सांगितले की, संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉक करते वेळी हल्ला झाला आहे. संदीप देशपांडे एकटेच मॉर्निंग वॉक करत होते. या वेळी चार लोक तिथे आले. त्यांनी देशपांडे यांच्यावर क्रिकेट स्टंपने हल्ला केला. हल्लेखोर आपला चेहरा झाकून आले होते. यावरुनच लक्षात येते की हा हल्ला पूर्व नियोजीत होता. झालेल्या हल्ल्यात देशपांडे यांच्या हात आणि पायाला दुखापत झाली आहे. संदीप देशपांडे यांनी अनेकांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. ज्यामुळे अनेकांच्या राजकीय जीवनावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी राह आहे, असेही धुरी म्हणाले.

ट्विट

दरम्यान, संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. या हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ते जोरदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. हल्लेखोरांची ओळख पटू दे आम्ही बघून घेऊ, असा इशाराच कार्यकर्त्यांनी दिला आहे.