
मुंबईतील (Mumbai) सायन रुग्णालयात (Sion Hospital) एका दीड महिन्याच्या बाळाने कोरोना (Coronavirus) विरुद्धची लढाई जिंकली असून त्याला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या चिमुकल्याची ब्रेन हॅमरेज (Brain Haemorrage) शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते, तिथेच त्याची कोरोना चाचणी सुद्धा करण्यात आली तेव्हा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबावर साहजिकच दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र या अवघ्या 7 आठवड्यांच्या बाळाने या दोन मोठ्या संकटाना मागे टाकत आता पुन्हा घरची वाट धरली आहे. या यशाबद्द्दल रुग्णालयांनी डॉक्टरननी आनंद व्यक्त करत सांगितले की, आठवडाभरापूर्वी या बाळाला बेशुद्ध अवस्थेत व्हेंटिलेटर वर पाहिले होते आता तो बरा होऊन हसत- खेळत आहे त्याची प्रकृती अगदी स्वस्थ आहे. ब्रेन हॅमरेजच्या शस्त्रक्रिया तर यशस्वी झालीच मात्र त्याचे कोरोनाचे दोन्ही रिपोर्ट्स सुद्धा निगेटिव्ह आले आहेत. मुंबई: कोरोनामुक्त झालेल्या एक महिन्याच्या बाळाला सायन हॉस्पिटल मधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा टाळ्याच्या गजरात निरोप; पहा व्हिडिओ
प्राप्त माहितीनुसार, या चिमुकल्याला ब्रेन हॅमरेज असल्याने त्याला 13 मे रोजी सायं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसानानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली, हे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. 17 मे पर्यंत या प्रकरणात आणखीन समस्या वाढू लागल्या. यावेळी त्वरित ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया करताना बाळाला कोरोना सुद्धा असल्याने डॉक्टरांना देखील अधिक सुरक्षा बाळगत प्रक्रिया करावी लागली. मात्र अखेरीस सर्व काही सुरळीत पार पडल्याने या बाळाला जीवनदान मिळाले आहे.(मुंबई मधील 10 दिवसांच्या बालकाची कोरोनावर मात; बालकासह आई देखील कोरोनामुक्त)
दरम्यान, या चिमुकल्याचे वडील सतीश पवार व आई अवनी पवार यांनी मुंबई मिरर शी बोलताना डॉक्टरांचे आभार मानले. ज्यावेळेस ब्रेन हॅमरेज विषयी कळले तेव्हा बाळ वाचेल का याचीही शाश्वती नव्हती कोरोनाचे निदान झाल्यावर तर आम्ही खचून गेलो होतो पण डॉक्टरांनी बाळाचे प्राण वाचवून आमच्यावर उपकार केले आहेत अशा शब्दात पवार दाम्पत्याने आपल्या भावना बोलून दाखवल्या.