Arrest | Representational Image | (Photo Credit: ANI)

Mumbai: गुन्हे शाखेच्या युनिट-1 कडून तीन जणांना कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा काळाबाजार करत असल्याने अटक करण्यात आली आहे. यामध्ये Bevacizumab 400mg इंजेक्शन आणि अॅन्टी कॅन्सर औषध जे कोरोनाग्रास्तांसाठी वापरले जाते त्याचा समावेश आहे. पोलिसांना टीप मिळाली असता गुन्हे शाखेकडून आरोपींना पकडण्यासाठी रिलायन्स हॉस्पिटल जवळ सापळा रचला गेला. संशयित व्यक्ती बाइकवर असलेल्यांना दोन जणांना फॉलो करत असताना पोलिसांनी पाहिले. ज्यावेळी संशयित व्यक्तीने त्या दोघांना एक पॅकेट दिले असता त्याचवेळी त्या तिघांना अटक करण्यात आली. त्या पॅकेटमध्ये BEVATAS 400 च्या दोन कुप्या असल्याचे समोर आले.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, संशयित व्यक्ती जयेश कलाल हा सीबीडी येथे राहत असून फार्मसीमध्ये कार्यरत आहे. त्याला 39,500 रुपयांचे असलेल्या औषधांचा दोन बॉटल्स जेव्हा 79,200 रुपयांना विक्री करत असल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अन्य दोन जणांची ओळख पटली असून अमोल राजपूत आणि आशिष चौरसिया अशी त्यांची नावे आहेत. दोघे ही उल्हासनगर येथील रहिवाशी असून एका क्लिनिकमध्ये कम्पाउंडरचे काम करतात.(Coronavirus Vaccination: मुंबईत आज 45 वर्षावरील नागरिकांना कोरोनाच्या लसीचा डोस दिला जाणार नाही)

दरम्यान, याआधी सुद्धा रेमिडेसिव्हर औषधांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली आहे. तर सध्या राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे चिंता व्यक्त केली जात असून वारंवार नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवहन करण्यात येत आहे. येत्या 15 मे पर्यंत राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला आहे. त्यानुसार फक्त अत्यावश्यक सेवासुविधा मर्यादित वेळासाठी सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात भंयकर परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच राज्यातील नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच करोना संसर्गाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबत आगाऊ नियोजन करून ठेवावे, असेही ते म्हणाले आहेत