COVID 19 Vaccine| Photo Credits: Twitter/ANI

Coronavirus Vaccination: मुंबईत आज 45 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस ही दिली जाणार नाही आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणानुसार 18-44 वयोगटातील सर्वांना कोरोनाची लस केंद्रावर दिली जाणार आहे. रविवारी, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी 2427 जणांना कोरोनाची लस दिली गेली. महापालिकेने असे म्हटले आहे की, आम्हाला लसीचा पुरेसा पुरवठा आलेला नाही. त्यामुळेच 45 वर्षावरील नागरिकांना लस दिली जाणार नाही आहे. यापूर्वी सुद्धा लसीचा तुटवडा भासत असल्याने याच वयोगाटातील लसीकरण मोहिम 30 एप्रिल ते 2 मे पर्यंत थांबवण्यात आले होते.

तर 18-44 वयोगटातील एकूण 3419 जणांना अवघ्या दोन दिवसांत लसीचा डोस दिला गेला आहे. अधिकाऱ्यांनुसार, लसीकरण 18-44 वयोगटाला सोमवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजता लस दिली जाणार आहे. परंतु ज्यांनी रजिस्टर केले असून आजच्या दिवसासाठी स्लॉट दिला गेला असलेल्यांनाच लस दिली जाईल असे महापालिकेने म्हटले आहे. मुंबईत लसीकरण नायर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, बीकेसी जम्बो कोविड सेंटर, सेव्हन हिल्स रुग्णालय आणि कुपर रुग्णालयात पार पडत आहे.(कोरोनाचा उद्रेक! पुणे जिल्ह्यात आज 11 हजार 661 रुग्णांची नोंद, 159 मृत्यू)

Tweet:

आजच्या दिवसासाठी प्रत्येक लसीकरण केंद्रावर फक्त 500 डोसच उपलब्ध आहेत. त्यामुळे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय आल्यास त्यांना तेथे परवानगी दिली जाणार नाही आहे. यासाठी नागरिकांनी रजिस्ट्रेशन करुन तुम्हाला दिलेल्या वेळेनुसार लसीकरण केंद्रावर यावे अशी विनंती महापालिकेकडून करण्यात आली आहे. रविवारी बहुतांश जणांनी अॅपवर रजिस्ट्रेशन न करता लसीचा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर पोहचल्याचे दिसून आले.(Mumbai: लसीकरणासाठी प्रोटोकॉलचे पालन करून केंद्रांवर गर्दी न करण्याचे BMC चे आवाहन)

केंद्र सरकारकडून लसीच्या डोसचा अतिरिक्त साठा आल्यानंतरच 45 वर्षावरील नागरिकांना ती दिली जाणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. तर नवा साठा आल्यानंतरच या वयोगटातील नागरिकांना दिली जाईल. लसीचा साठा किती आहे ते पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतरच नागरिकांना कळवले जाईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.