मुंबईच्या वांद्रे भागातील बॅण्ड स्टॅण्ड परिसरातील आज (13जून) समुद्रात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही व्यक्ती 29 वर्षीय असून त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'वायू' चक्रीवादळ (Vayu Cyclone) घोंघावत आहे. या चक्रीवादळाचा मुंबईला धोका नसला तरीही समुद्र किनार्यांपासून दूर राहण्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई: चर्चगेट स्टेशन जवळ होर्डिंग कोसळून मृत पावलेल्या मधुकर नार्वेकर यांच्या कुटुंबियांना पश्चिम रेल्वेची मदत
ANI Tweet
#Mumbai: 29-year-old man dies after drowning in sea at Bandra Bandstand.
— ANI (@ANI) June 13, 2019
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, कोकण परिसरात 12 आणि 13 जून दरम्यान भरतीच्या वेळा आणि वायू चक्रीवादळाचा प्रभाव एकाच वेळी असल्याने सुरक्षा यंत्रणांनी मच्छिमारांसह नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून वायू चक्रीवादळामुळे मुंबईत वारा आणि पाऊस हजेरी लावत आहे.