Mega Block | (File Image)

दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि मशीद बंदर स्थानकादरम्यानचा ( Masjid Bunder Station) ब्रिटिशकालीन कर्नाक पूल (British-era Carnac Bridge० पाडण्यात येणार आहे. हा पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वे (Central Railway) शनिवारी (19 नोव्हेंबर) रात्रीपासून 27 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेणार आहे. रविवारचा दिवस असल्याने अनेक लोक घराबाहेर पडत असतात. पण, येत्या रविवारी तुम्ही जर मध्य रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आगोदल मेगाब्लॉकचे वेळापत्रक जाणून घ्या. अन्यथा तुम्हाल मनस्ताप सहन करावा लागू शकतो. दीर्घ पल्लाचा मेगाब्लॉक असल्याने आपणास प्रवास करायचाच असेल तर शक्यतो रस्ते वाहतूकीचा पर्याय निवडा.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मेगा ब्लॉक रात्री 11 वाजता (19 नोव्हेंबर रोजी) सुरू होईल आणि 21 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजता संपेल. ज्यामुळे या कालावधीत उपनगरीय आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल. (हेही वाचा, Mumbai Local Update: ब्रिटीशकालीन कारनाक पूल तोडण्यासाठी मध्य रेल्वेकडून 19 नोव्हेंबरच्या रात्रीपासून 27 तासांचा ब्लॉक जाहीर)

ट्विट

ट्विट

मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दैनंदिन लोकल ट्रेनमधील 37 लाखांहून अधिक प्रवासी. तसेच, बाहेरुन येणाऱ्या गाड्यांमधून (एक्सप्रेस) प्रवास करणाऱ्यांवर प्रवाशांवर विशेष ब्लॉकचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय वेळापत्रकानुसार 1,800 हून अधिक लोकल ट्रेन सेवा धावतात. ज्यात 'हार्बर' आणि 'मेन' ​​मार्गांचा समावेश आहे आणि त्या दक्षिण मुंबईतील CSMT पासून निर्गमीत होतात. .