
Mumbai: टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने एका मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अफसाना खान असे मृत मुलीचे नाव असून ही घटना मुंबईतील धारावीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी उठल्यानंतर ती अर्धवट झोपेत होती. त्याचवेळी तिने दात घासण्यासाठी टूथपेस्ट ऐवजी उंदीर मारण्याचे औषध ब्रशला लावले आणि दात घासू लागली. जेव्हा टूटपेस्टची चव वेगळी लागण्यास सुरुवात झाली तेव्हा तिला कळले आणि पटकन तिने चूळ भरली. तेव्हा तिला चक्कर येत ती खाली पडली.
घरातील मंडळींनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु केले पण विष तिच्या संपूर्ण शरिरभर पसरले गेले होते. रविवारी संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. अफसाना हिच्या परिवारात तिची आई, दोन वर्षाची मोठी बहिण आणि दोन लहान भाऊ आहेत.(Thane Shocker: भिवंडी मध्ये 16 वर्षीय गतिमंद मुलीवर कुटुंबातील व्यक्तीकडूनच बलात्कार)
अफसाना ही एक विद्यार्थिनी होती. तर तिचे शिक्षण आता अपूर्ण राहिले आहे. अफसाना हिची आई फळ विकून घरात खर्च करते. अफसाना हिच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाला अकाली मृत्यू म्हणून जाहीर केले. याबद्दल अधिक तपास सुरु आहे. याच दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना असे ही आवाहन केले की, विषारी गोष्टी घरात सहज हातात सापडतील अशा ठेवू नये.