ST Bus | (Photo credit: archived, edited, representative image)

कोकणात गणेशोत्सवासाठी (Ganpati Festival) जाण्यासाठी रेल्वेचं बुकिंग फुल्ल झालं आहे त्यामुळे आता एसटी (ST Buses) कडून अधिकच्या बस सोडल्या जाणार आहेत. यंदा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय झाला आहे. या बससेवेमध्येही 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत कायम ठेवली जाणार आहे.

2 सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. मागील वर्षी देखील अशाच प्रकारे अधिकच्या बस सोडण्यात आल्या होत्या. प्रवाशांना npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर तिकीट बुकिंग उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारेही उपलब्ध होणार आहे. नक्की वाचा: Ganeshotsav 2024: गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्ग खड्डेमुक्त होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.

यंदा गणपती 7 सप्टेंबरला येणार आहेत. कोकणात दीड, तीन, पाच, सात आणि दहा दिवसांचे गणपती बसतात. त्यानिमित्ते मोठ्या संख्येने कोकणवासी गावी आवर्जुन येतात. यामध्ये गौरी आगमनाचा देखील मोठा सोहळा साजरा केला जातो. Ganpati Festival 2024 Special Trains By WR: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍यांना पश्चिम रेल्वेकडून चालवल्या जाणार 6 स्पेशल ट्रेन; इथे पहा संपूर्ण यादी .

कोकणात जाण्यासाठी रेल्वे बुकिंग फुल्ल! 

कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे कडून यंदा स्पेशल ट्रेन सोडल्या गेल्या आहेत. चार महिने आधीच ट्रेन बुकिंग सुरू केले जाते ते पण फुल्ल झालं आहे त्यामुळे प्रवाशांची कोकणात जाणारी गर्दी पाहता 200 हून अधिक स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. पण या ट्रेनची तिकीटं देखील फुल्ल्लं  झाली आहेत त्यामुळे आता अनेकांची भिस्त रस्ते मार्गा वर आहे. एसटी बसने जाण्यासाठी विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.