Photo Credit -X

कोकणवासियांसाठी गणेशोत्सव (Ganeshotsav) हा एक महत्त्वाचा सण आहे. चाकरमान्यांना कोकणात (Konkan) आपल्या गावी जाण्यासाठी विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेपाठोपाठ आता पश्चिम रेल्वे कडूनही या स्पेशल ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने (Western Railway) कोकणात जाणार्‍यांची गर्दी पाहता 6 विशेष ट्रेन्स जाहीर केल्या आहेत. या ट्रेन्सची बुकिंग 28 जुलै पासून सुरू केली जाणार आहे.

पश्चिम रेल्वेकडून जाहीर केलेल्या या स्पेशल ट्रेन मुंबई मध्ये मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकामधून सुटणार आहेत. मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड (09009 / 09010) आठवड्यातून सहा दिवस चालवली जाईल. बांद्रा ते कुडाळ साप्ताहिक विशेष (09015 / 09016), अहमदाबाद ते कुडाळ (09412 / 09411) साप्ताहिक विशेष, विश्वामित्री ते कुडाळ (09150 / 09149) साप्ताहिक स्पेशल फेअर ट्रेन, अहमदाबाद ते मंगळूरु (09424 / 09423) साप्ताहिक स्पेशल फेअर ट्रेन चालवली जाणार आहे. नक्की वाचा: Ganeshotsav 2024: गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्ग खड्डेमुक्त होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.

पहा पश्चिम रेल्वे वरील गणपती विशेष ट्रेन्सचं वेळापत्रक

गणपती विशेष ट्रेन्सचं बुकिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात केले जाऊ शकतं. मात्र अवघ्या काही मिनिटांतच बुकिंग फुल्ल होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर दिवशी आहे तर अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबर दिवशी आहे. हे 10 दिवस मुंबई सह कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो.