Results 2019

12th Std Results Date: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या (28 मे) दिवशी जाहीर होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थी त्यांच्या परीक्षा निकालाच्या तारखेची वाट पाहत होते. आज मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार 28 मे दिवशी दुपारी एक वाजता हा निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईट सोबत थर्ड पार्टी वेबसाईट्सवरही विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे. Maharashtra Board SSC HSC Results 2019: 12,10 वीचा निकाल लवकरच; मेडिकल, इंजिनियरिंग ते FYJC अ‍ॅडमिशन साठी राखीव कोट्यात आरक्षणाचा फायदा मिळवण्यसाठी ही 5 सरकारी कागदपत्र ठेवा तयार

कसा पहाल 12 वीचा निकाल?

  • mahresult.nic.in ही वेबसाईट ओपन करा.
  • अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.
  • त्यानंतर HSC Examination Result 2019 वर क्लिक करा
  • आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेकट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करायचं आहे.
  • त्यापुढे View Result वर क्लिक करा
  • तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल
  • तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.

महाराष्ट्र बोर्डचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स

mahresult.nic.in,

maharashtraeducation.com, results.mkcl.org,

mahahsscboard.maharashtra.gov.in,

mahahsscboard.in

Maharashtra Board HSC Result 2019: मोबाईलवर SMS च्या माध्यामातून कसा पहाल 12 वीचा निकाल?

मागील वर्षी बारावीचा निकाल 30 मे 2018 दिवशी लागला होता. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान पार पडली आहे. बारावी पाठोपाठ दहावीचे निकाल जून 2019 च्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.