MPSC Student Protest| Twitter

एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कालपासून राज्यातील काही मुख्य शहरात सरकारविरोधी आंदोलन पुकारलं होतं. एमपीएससी परिक्षेचा अभ्यासक्रम या वर्षिपासून म्हणजे २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे. दरम्यान मुख्य परीक्षेचे नवे पॅटर्न 2025 पासून सुरू करावे आणि अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे या मागणीसाठी एमपीएससीची तयारी करणारे रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे आता एमपीएससीची परीक्षा यूपीएससीच्या धर्तीवर घेण्याचा त्यांचा मानस आहे. तरी तब्बल १८ तासांच्या आंदोलनानंतर अखेर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. तरी विद्यार्थ्यांच्या मागणी आणि प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी एमपीएससीच्या पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर एमपीएसीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघणार का याकडे संपूर्ण राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागलं आहे.

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीची रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यापुढच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनं होणार आहे. ही नवी परीक्षा पद्धती २०२३ पासून म्हणजे याच वर्षीपासून लागू करण्यात येणार आहे. तरी सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी राज्यातील एमपीएसचे विद्यार्थी आक्रमक झाले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीचं आश्वासन दिल्यानंतर पुण्यातलं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.(हे ही वाचा:- MPSC Student Protest: महाराष्ट्रभर एमपीएससी विद्यार्थ्यांचं पुन्हा आंदोलन; ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबवण्याची मागणी)

 

पुण्यातील अलका टॉकी चौकात एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे गेल्या 18 तासापासून आंदोलन सुरु होतं. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहे.  विद्यार्थ्यांनी रात्रीच्या एवढ्या थंडीत आंदोलन सुरुच ठेवले होते. जवळपास 700 विद्यार्थी रस्त्यावर बसून होते. त्यांना तुम्ही एक शिष्टमंडळ घेऊन भेटण्याचा प्रयत्न करा असेही पोलिसांनी विद्यार्थ्यांना सांगितले. पोलिसांच्या आवाहनानंतर आता विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केलं आहे.