महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नव्या परीक्षा पद्धतीवरून आज पुन्हा एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पुण्यासह राज्यभर त्यांनी तीव्र आंदोलनाला सुरूवात केली आहे. दरम्यान मुख्य परीक्षेचे नवे पॅटर्न 2025 पासून सुरू करावे आणि अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे या मागणीसाठी सारे रस्त्यावर उतरले आहेत.
एमपीएससी कडून वर्णनात्मक पद्धती लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता एमपीएससी ची परीक्षा यूपीएससी च्या धर्तीवर घेण्याचा त्यांचा मानस आहे. पण मुख्य परीक्षेमधील हा बदल यंदाच्या वर्षीपासूनच लागू करण्याचा निर्णय झाल्या ने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उमटली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे अनेकांना त्यानुसार अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळालेला नाही आणि त्यामधून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकतं असा दावा केला जातो. नक्की वाचा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून 2023 वर्षातील आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जारी .
पहा आंदोलक विद्यार्थी
#MPSC #आंदोलन #फुलेचौक#राज्यसेवा pic.twitter.com/O8pA7e1yOp
— Rockstar? (@damale_rakesh) January 13, 2023
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, राज्यसेवेची मुख्य परीक्षा 2023 पासून वर्णनात्मक करण्याऐवजी 2025 पासून हा बदल लागू करावा. विद्यार्थ्यांच्या या मागणीला युवक कॉंग्रेसच्या वतीने पाठिंबा मिळाला आहे. आज पुण्यात अलका टॉकीजमध्ये या मागणीसाठी अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. पुण्याप्रमाणेच कोल्हापूर, औरंगाबाद मध्येही विद्यार्थी एकत्र जमले आहेत.