Seawoods Railway Station | File Image

नवी मुंबई (Navi Mumbai)  मध्ये लोकल ट्रेन मध्ये मदत मागण्याचा बहाणा करत 15 दिवसाच्या बाळाला सोडून आई फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 1 जुलै च्या दुपारची आहे. सीएसएमटी- पनवेल (CSMT-Panvel) दरम्यान हा प्रकार घडला आहे. हातात सामान आणि बाळ आहे मदत करा असं म्हणत आईने दोन मुलींकडे बाळ दिले. सीवूड्स स्थानकामध्ये उतरायचं आहे असं सांगितलं. मुली उतरल्या पण आई उतरलीच नाही. नंतर परतही आली नाही. मुलींनी वाट पाहिली पण ती महिला परत न आल्याने अखेर मध्ये तक्रार दाखल केली. सध्या फरार महिलेचा शोध सुरू आहे.

NDTV Marathi च्या वृत्तानुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये वाशी रेल्वे पोलिस सध्या 30-35 वर्षीय महिलेचा शोध घेत आहेत. या महिलेने दिव्या नायडू आणि भूमिका माने या ट्रेन मध्ये प्रवास करणार्‍या किशोरवयीन मुलींकडे मदत मागितली. मदतीच्या बहाण्याने बाळ त्यांना दिले आणि स्वतः ट्रेन मधून न उतरता फरार झाली. दोघी मुली त्या बाळासह असलेल्या महिलेला मदत करण्यासाठी स्वतः जुईनगर स्थानक सोडून सीवूड्स येथे उतरल्या. नक्की वाचा:  Adoption Fraud at KEM Hospital: केईएम रुग्णालयात बेकायदेशीरपणे नवजात बाळ दत्तक घेण्याचा प्रकार, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल .

महिलेविरोधात भारतीय न्या. संहिता (BNS) कलम 93 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने सध्या मुलींचा तपास सुरू आहे. बाळाच्या आईविषयी किंवा तिच्या ओळखीविषयी कोणाकडेही माहिती असल्यास, वाशी रेल्वे पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.