Monsoon | Representational Image (Photo Credits: Pixabay)

राज्यातील बळीराजासह कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी खुशखबर आहे. यंदा उन्हाळा वाढला म्हणून चिंता करु नका. उन्हाळ्यानंतर येणारा पावसाळाही (India Monsoon 2022) बहारदार असणार आहे. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने याबाबत अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार भारतात यंदा मान्सून (Monsoon 2022) जोरदार बरसरणार आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याचे महीणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही महिन्यांमध्ये यंदा पाऊस बरसणार आहे. ऑस्ट्रेलियन हवामान विभाग हा जगभरात पावसाबाबत अचूक अंदाज व्यक्त करण्याबाबत ओळखले जाते. महत्त्वाचे म्हणजे भारतीय हवामा विभागाने मात्र आतापर्यंत मान्सून 2022 बाबत कोणताही अंदाज वर्तवला नाही.

ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने म्हटले आहे की, यंदाच्या वर्षी मान्सून सामान्य असेल. सामान्य याचा अर्थ असा की, पावसाळ्यातील जवळपास सर्वच महिन्यात पुरेसा पाऊस पडणे. प्रामुख्याने जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात उच्चांकी पाऊस पडेल. सप्टेंबर महिन्यात आगोदरच्या तीन महिन्यांच्या तुलनेत पावसाचा वेग काहीसा मंदावेल. हा वेग मंदावला असला तरी पाऊस कायम राहील. वर्षातील जवळपास सर्वच महिने बळीराजा पावसाची वाट पाहात असतो. पडणाऱ्या पावसावरच त्याचे सर्व काही अवलंबून असते. त्यामुळे पर्जन्यमान चांगले असले तर तो खूश असतो. शेतीमध्ये तो अधिक मेहनत करुन चांगले उत्पन्न काढतो. (हेही वाचा, Maharashtra Rain Update: पुढील 2 ते 3 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याची माहिती)

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मात्र आतापर्यंत मान्सूनबाबत कोणत्याही प्रकारे अंदाज व्यक्त केला नाही. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय हवामान विभाग अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी नागरिकांना भारती हवामान विभाग काय म्हणतो याबाबत उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला एक्यूवेकर या वेदर कंपनीनेसुद्धा अंदाज व्यक्त करत म्हटले आहे की, यंदा भारतात दुष्काळ पडणार नाही.