Maharashtra Rain Update: पुढील 2 ते 3 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याची माहिती
Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 22 जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस  अवकाळी पावसाचा (Rain) अंदाज हवामान खात्याने (Weather department) वर्तवला आहे. 7 मार्च ते 9 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुंबई आणि त्याच्या लगतच्या भागात आणि कोकणात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील भागात पावसाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, उत्तरेकडील चक्री वाऱ्यांमुळे उत्तरेकडील भागातही पावसाची शक्यता आहे. या सर्वाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून 7 मार्च रोजी उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भात आणि 8, 9 मार्च रोजी महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ, धुळे, नंदुरबार. , नाशिक , जळगाव जिल्ह्यात पाऊस अपेक्षित आहे. दुपारनंतर राज्यातील अनेक भागात ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. याशिवाय तापमानातही घट झाली आहे. कमी दाबाचे क्षेत्र ईशान्येकडे सरकत आहे. हेही वाचा Maharashtra Farmer: पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन

त्यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि त्याच्या लगतच्या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही त्यांचा प्रभाव पडेल. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओलावा असलेले वारे महाराष्ट्राच्या दिशेनेही पोहोचत आहेत. त्यामुळे 7 मार्चपासून महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 7 मार्चपासून पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

थंडी नुकतीच गेली होती की उष्णता वाढू लागली होती. उष्मा वाढत होता की अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमानात वाढ झाली आहे. अशा स्थितीत हवामान खात्याचे तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या मते, 7 ते 9 मार्च दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात मेघगर्जनेसह पाऊस पडेल.