
Mumbai Monsoon Arrival Update: मुंबईसह राज्यभरात सूर्य आग (Mumbai Tempreture) ओकत आहे, एवढा उन्हाचा तडाखा वाढला आहे. मात्र, वाढत्या गरमीत एक दिलासा दायक माहिती मिळत आहे. ती म्हणजे उन्हाळा फक्त दोन महिने राहीला आहे. एप्रिलचा चालू महिना आणि मे. कारण, जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येण्याची शक्यता 88-90% आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मान्सून (Mumbai Rain Update) जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. Heat Stroke Cases in Maharashtra: यंदाचा उन्हाळा कडक! गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये महाराष्ट्रात उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ; 34 घटनांची नोंद
त्याशिवाय, काही दिवसांपूर्वी हवामान विषयक अंदाज करणारी खासगी संस्था स्कायमेटने यंदा महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस समाधानकारक होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. स्कायमेटने 2025 मध्ये भारतात मान्सूनचा पाऊस किती होईल याबाबतचा अंदाजही वर्तवला असून जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून असेल.
Good news on Monsoon 2025 🤩
Monsoon in Mumbai is likely to arrive in the first week of June 2025 with 88-90% probability! ⛈️#MumbaiRains pic.twitter.com/6Z96Gpsr8U
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) April 15, 2025
स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तसेच पश्चिम आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस होईल. त्याशिवाय, किनारपट्टीची राज्ये केरळ, कर्नाटक किनारपट्टी आणि गोवा या भागांत विशेषतः अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये आणि पर्वतीय भागात सरासरीच्या तुलनेत थोडासा कमी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
.