Money Laundering Case: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या CA च्या नागपूर येथील 12 ठिकाणांवर सीबीआय कडून छापेमारी
CBI (Photo Credits-Twitter)

Money Laundering Case: सीबीआयकडून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नागपुर स्थित त्यांच्या सीए संबंधित 12 ठिकाणांवर शनिवारी छापेमारी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, दिल्ली आणि मुंबई येथून सीबीआयची टीम नागपुरात दाखल झाली. शनिवारी सकाळी तपास सुरु करण्यात आला. एका अधिकाऱ्याने म्हटे की, 12 ठिकाणांमध्ये देशमुख यांचे सीए आहे किंवा त्यांचे घर अथवा कार्यालयाचा परिसर आहे. नागपुरात राहणारे देशमुख गेल्या वर्षात मुंबईतील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह द्वारे त्यांच्या विरोधात लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर राज्याच्या गृहमंत्री पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

देशमुख यांना गेल्या वर्षात ईडीकडून 1 नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयने 21 एप्रिल 2021 मध्ये कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर देशमुख यांच्या विरोधात तपास सुरु केला होता. ईडीचे हे प्रकरण राज्याचे गृहमंत्री असताना देशमुख यांनी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या माध्यमातून मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटकडून 4.70 कोटी रुपयांची वसूली केली होती. ईडीने दावा केला की हे पैसे नागपुर येथील श्री साई शिक्षण संस्थेला पाठवण्यात आले. ही संस्था देशमुख यांच्या परिवाराद्वारे चालवली जाते.(NCB चे माजी झोनल डायरेक्टर Sameer Wankhede यांना मोठा दिलासा; वानखेडे हे अनुसूचित जातीचेच आहेत - SC आयोगाची माहिती)

दरम्यान, सचिन वाझे यांनी ईडीला एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्य जणांच्या विरोधात केंद्रीय तपास एजेंसीद्वारे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शासकीय साक्षीदार बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या वाझे यांना अँटेलिया बॉम्ब प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुद्धा त्यांच्यावर आरोप लावण्यात आले आहेत.