Pune Molestation Case: पुणे शहरात नेमकं घडतंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका युवतीची हत्या केल्याची घटना घडल्यानंतर आणखी एका तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार पुढे आला होता. या घटनांना काहीच दिवस उलटण्याच्या आत पुन्हा एकदा पुणे शहरात तरुणीच्या विनयभंगाची घटना घडली आहे. धक्कादायक असे की, शहरातील उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या कॅम्प परिसरातील एमजी रस्त्यावर ही घटान घडली. एक तरुणी टी-शर्ट खरेदीसाठी कपड्यांच्या दुकानात गेली असता तेथी कामगाराने तिच्यासोबत हा प्रकार केला. टी-शर्ट घालण्यास मदत करतो असे सांगत या तरुणाने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.
पुण्यातील कॅम्प परिसरातील एमजी रस्त्यावर नाथ चौकात एक कापड्यांचे दुकान आहे. याच दुकानात 20 वर्षीय पीडिता खरेदीसाठी गेली होती. या वेळी तिच्यासोब दुकानातील तरुणाने अश्लिल वर्तन केले. पीडितेने दुकानात काही टी-शर्ट पाहिले. त्यानंतर तिने त्यातील एक शर्ट खरेदीही केला. मात्र, तो परिधान करण्यासाठी आपण मदत करतो, असा बहाणा करुन दुकानातील तरुणाने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. घटनेने सैरभैर झालेल्या तरुणीने नजिकच्या लष्कर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एका विरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी पीडितेने दिलेल्या तक्रार आणि वर्णनावरुन कैफ करीममुल्ला शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा, Pune Water Level: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, धरणांच्या पाण्यामध्ये मोठी वाढ)
पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनत चालली आहे. राज्याच्या गृहमंत्रालयाचे कायदा आणि सुव्यवस्था यांकडे लक्ष तरी आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरामध्ये अनेक महान विभूती घडल्या. त्यांनी केवळ शहर, राज्यच नव्हे तर देश पातळीवर अमिट ठसा उमठवला, असे असताना अलिकडील काही काळात शहराच्या नावलैकिकाला बाधा येईल अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत. त्यामुळे जाणकार आणि अस्सल पुणेकरांसोबतच जागृक नागरिकही चिंता व्यक्त करत आहेत. पुणे पोलिसांकडूनही अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, तरीही अशा घटना का घडत आहेत? याबाबत अभ्यास होणे गरजेचे असल्याचे नागरिक बोलत आहेत.