MNS | Twitter

मराठी-अमराठी वादाचे तीव्र पडसाद मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये उमटू लागले आहे. महाराष्ट्रात राहायचे, नोकरी करायची तर मराठी आलेच पाहिजे. मराठी भाषाच महाराष्ट्रात प्राधान्यक्रम असायला पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्यक्त केली होती. त्यानुसार मनसे कार्यकर्ते सक्रीय झाले असून, ते अनेक अस्थापनांना भेटी देऊन मराठीचा आग्रह धरत आहेत. अशातच मनसे कार्यकर्ते आणि बँक ऑफ इंडिया या बँकेचे व्यवस्थापक (मॅनेजर) यांच्यात मोठा वाद झाल्याचे समजते. बँक मॅनेजरने कथीतरित्या मराठी बोलण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सदर मॅनेजरला मारहाण केल्याचे समजते.

मनसे आणि बँक मॅनेजरमध्ये वादावादी