महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray Press Conference) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज (6 मार्च) पत्रकार परिषद घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे (Raj Thackeray Press Conference) काय बोलणार, भूमिका जाहीर करणार याबाबत उत्सुकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांच्यात काल (5 मार्च) रात्री चर्चा झाली. या चर्चेनंतर राज ठाकरे आज प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत. त्यामळे या पत्रकार परिषदेला विशेष महत्त्व आले आहे. सुरुवातीला मनसेने लॉकडाऊनला तीव्र विरोध केला होता. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांशी चर्चा केली. त्यानंतर विरोधकांचा विरोध काहीसा मावळला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात सुमारे 20 मिनीटे संवाद झाला. झूम मीटिंगद्वारे झालेल्या या संवादावेळी राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे आणि मनसे नेते संदिप देशपांडे हेसुद्धा उपस्थित होते. या संवादावेळीचा एक फोटोही मनसेने आपल्या ट्विटर हँडलवर प्रसिद्ध केला आहे. (हेही वाचा, मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांचे पंतप्रधान Narendra Modi यांना पत्र; 25 वर्षापुढील सर्वांना कोरोनाची लस देण्याची केली विनंती)
आज सकाळी ११.०० वा. कृष्णकुंज येथे मनसे अध्यक्ष सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे प्रसार माध्यमांशी संवाद साधणार. #rajthackeraylive #मनसे_पत्रकारपरिषद #MNS_PressConference pic.twitter.com/tEzYTkinHq
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 6, 2021
दरम्यान, या चर्चेतील तपशील बाहेर आला नाही. मात्र, राज ठाकरे यांनी कोरोना नियंत्रणाबाबत काही तपशीलवार मुद्दे मांडले. तसेच, राज्य सरकारला काही सल्लावजा सूचनाही केल्याचे समजते. राज ठाकरे हे या बैठकीसाठी मुद्दे घेऊन बसले होते. त्यामुळे काही गंभीर विषयांवरही चर्चा झाल्याचे समजते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे ह्यांच्याशी टाळेबंदी, निर्बंध व उपाययोजना ह्या मुद्द्यांवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली. #लढाकोरोनाशी #BreakTheChain pic.twitter.com/9E2Dn0f6lU
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 5, 2021
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना साद घालत कोरोना प्रतिबंधांसाठी आवश्यक उपाययोजना करताना सहकार्य करा असे अवाहन केले होते. राज्यात पुन्हा एकदा अंशकालीन लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांशी चर्चा केली. विरोधकांनी सहकार्याचे अश्वासन दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन जाहीर करण्याबाबत आणि कडक निर्बंध लागू करण्याबाबतचा निर्णय जाहीर केला.