मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांचे पंतप्रधान Narendra Modi यांना पत्र; 25 वर्षापुढील सर्वांना कोरोनाची लस देण्याची केली विनंती
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहले आहे. तसेच कोरोना संसर्गाचा विळखा तरूण वर्गाला बसल्याचे दिसत आहे. यामुळे 25 वर्षापुढील सर्वांना कोव्हीड प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्राने कोव्हीड लसीकरणास अतिशय गांभीर्याने घेतले आहे. राज्यात कालपर्यंत (4 एप्रिल) 76.86 लाख नागरिकांना कोव्हीड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. राज्यात 3 एप्रिल रोजी सर्वाधिक 4.62 नागरिकांना लस देण्यात आली आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी साधला संवाद; लॉकडाऊन, निर्बंध आणि उपाययोजनांसंदर्भात केली चर्चा

उद्धव ठाकरे यांचे पत्र-

महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. राज्यात आजही 47 हजार 288 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 155 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 25 लाख 49 हजार 75 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 56 हजार 33 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 4 लाख 51 हजार 375 रुग्ण सक्रीय आहेत.