सरकारच्या 'या' धोरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भडकले, पाहा काय म्हणाले?
Raj Thakrey (Photo: PTI)

महाराष्ट्र (Maharastra) सरकारच्या (government) गड-किल्ले भाड्याने देण्याच्या धोरणावर (policy) किल्लेप्रेमींसह राज्यभरातून अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारची खिल्ली उडवली जात आहे. यातच आता महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही या धोरणाला विरोध दर्शवत सरकारवर जोरदार टिका केली आहे. सरकारला उत्पन्न मिळवायचे असल्यास त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत, त्यातून अधिक पैसे प्राप्त होतील. यासाठी गड किल्ले भाड्याने देण्याची गरज नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. तसेच गड किल्ल्यांना हात लावल्यास सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2019) पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे डोंबिवली (Dombivli) येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यातल्या गड, किल्ल्यांना हात लावायची हिंमतही करु नका. महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी हे सहन करणार नाहीत. याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देत सरकारला उत्पन्नच हवे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावे. हे देखील वाचा: मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय उत्तम- संजय निरुपम

"महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास आहे. मात्र सरकारला याचे काहीच देणेघेणे नाही. जर सरकारला उत्पन्न हवे असेल, तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत. त्यातून अधिक पैसे मिळतील. भाजप (Bhartiya Janta Party) मशीनमध्ये हेराफेरी करुन निवडून येत आहे. त्यामुळे ते लोकांना विचारातही घेत नाहीत."अशी टीकाही त्यांनी केली.