Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

MNS Gudi Padwa Melava: दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पाडवा मेळावा 9 एप्रिल रोजी मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. दरम्यान एकीकडे युवा सेना सज्ज झालेली दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे मनसेच्या या मेळाव्याला मुंबई महानगर पालिकेने परवानगी दिली आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर येवून आहे आणि त्यामुळे सर्वांच लक्ष पाडवा मेळाव्यात काय घडणार या कडे आहे.(हेही वाचा- केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात, सर्वजण सुखरुप

9 एप्रिल रोजी मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कवर मैदानावर पाडवा मेळावा होणार असल्याने मनसेची जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार ? लोकसभा संदर्भात घोषणा करणार का ? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. मुंबई पालिकेकडून शिवाजी पार्कची परवानगी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांची भुमिका ऐकण्यासाठी हजारो कार्यकर्ते मुंबई हजेरी लावणार आहे.

आगामी लोकसभा निवडणूकी पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्र मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. दरम्यान मनसे आणि भाजप युतीच्या हालचालींचा वेग वाढलेला दिसून येत आहे. यांच्या भेटीमुळे मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे महायुती संदर्भात घोषणा होणार का? याकडे लक्ष लागले आहे.