Ramdas Athawale Car Accident: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात, सर्वजण सुखरुप
Ramdas Athawale | (Photo Credits: ANI)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) (Republican Party of India (A)) आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale Car Accident) यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. सातारा (Satara) येथील वाई (Wai) परिसरात ही घटना घडली. अपघात घडला तेव्हा आठवले यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि कुटुंबीय वाहनात होते. आपल्या वाहनास अपघात झाला असला तरी आपण आणि आपले कुटुंबीय सुखरुप आहेत. कोणतीही दुखापत नाही, अशी माहिती स्वत: रामदास आठवले यांनी दिली आहे.

रामदास आठवले यांनी माहिती देताना सांगितले की, आपण राजकीय दौऱ्यावर होतो. पक्ष कार्यकर्त्यांची एक बैठक होती. ही बैठक महाबळेश्वर येथे पार पडली. या बैठकीनंतर मुक्काम करुन आम्ही निघालो असता खंडाळा येथील बोगद्यात एक वाहन आमच्या वाहनावर आदळले. त्यामुळे हा अपघात घडला. अपघात घडला असला तरी आम्ही सुखरुप आहोत. आम्हाला कोणतीही दुखापत झाली नाही. (हेही वाचा, Ramdas Athawale: रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षासाठी भाजपकेड दोन जागांची मागणी)

एक्स पोस्ट

वृत्तसंस्था एएनआने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रामदास आठवले यांचा वाई, सातारा येथे अपघात झाला. मार्गावरुन जाणाऱ्या कंटेनरने अचानक ब्रेक लावल्यानंतर आठवले यांची कार कंटेनरला धडकली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.