राज ठाकरे व्यंगचित्र (फोटो सौजन्य- ट्विटर)

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) सीबीआयचे संचालक आलोक कुमार वर्मा (CBI Director Alok Verma) यांना रजेवर जाण्याचा आदेश रद्द करण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारला दणका बसल्याचे म्हटले गेले. परंतु वर्मा यांना पुन्हा CBI चे संचालक पदाचा भार देण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोदी सरकारवर व्यंगचित्रातून सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकाला 'जागा' जाखवली! असे म्हणत फटकारे दिले आहेत.

राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रातून आलोक वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश या वर्माजी बसा असे सांगत असून त्यांनी सीबीआयच्या खूर्चीवर बसण्याची विनंती करत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) कटघऱ्यात उभे राहून वर्मा यांची फेरनियुक्ती केल्याबद्दल विरोध करत असल्याचे दिसत आहे. तसेच न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयावर मोदींना धक्का बसल्याचे कळत आहे.(हेही वाचा-आलोक वर्मा यांना सुट्टीवर पाठवणं चूकीचं - सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका)

आलोक वर्मा आणि सीबीआयमधील विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वादातून वर्मा यांना रजेवर पाठवण्यात येणार होते. परंतु सरन्यायाधीश रंजन गोगई (Ranjan Gogoi) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 6 डिसेंबर 2018 रोजी निकाल राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आलोक वर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु मोदी सरकारला दणका दिल्याचे म्हटले जात आहे.