महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) आज 18 वा वर्धापन दिन नाशिक (Nashik) मध्ये साजरा करण्यात आला आहे. या वर्धापन दिनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. राजकारणामध्ये टिकायचं असेल तर 'संयम' महत्त्वाचा आहे हा मूलमंत्र देताना पक्षात जातीपाती ला थारा नसेल असेही ठणकावून सांगितलं आहे. सध्या राज्यात सुरू असलेले राजकारण म्हणजे अळवावरचं पाणी आहे. आपल्याला यश मिळणार थोडा संयम ठेवा असं म्हणताना त्यांनी 'मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. आणि तेवढी धमक मी ठेवतो' असं म्हणत सूच्क वक्तव्य केलं आहे.
लोकसभा निवडणूका आता अगदी कधीही जाहीर होऊ शकतात अशी स्थिती आहे. काही पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. अशात मनसे महायुती मध्ये सहभागी होण्याबाबत आज राज ठाकरे काही घोषणा करतात का? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते मात्र त्याबाबत निवडणूकांमध्ये बोलणार आहोत आणि अन्य विषयांवर सविस्तर 9 एप्रिलला शिवतीर्थ मैदानावर आपण बोलू असं म्हटलं आहे.
राजकारणात टिकायचं असेल तर संयम अतिशय महत्त्वाचा असतो ! #मनसे_वर्धापनदिन pic.twitter.com/2G8svKLU6z
— Raj Thackeray (@RajThackeray) March 9, 2024
मनसेच्या स्थापनेनंतर यंदा पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी नाशिक मध्ये मनसेचा वर्धापन दिन सोहळा आयोजित केला होता. या निमित्ताने ते 3 दिवसीय नाशिक दौर्यावर आहेत. काल महाशिवरात्र दिवशी त्यांनी काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाची आरती देखील केली.
मनसे च्या 18 वर्षांच्या प्रवासात अनेक चढ उतार आले पण या प्रवासात साथ दिलेल्या त्यांच्या सहकार्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. यावेळी महाराष्ट्रात पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि त्यानंतर मनसे हा पक्ष आहे. असे सांगताना एनसीपी म्हणजे शरद पवारांनी निवडून येणार्या लोकांची बांधलेली मोळी आहे. असं म्हणत पुन्हा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अजित पवार शरद पवार वेगळे झाले असले तरीही आतून एक ते एकच आहेत. असं म्हणत सध्याच्या राजकारणावर टीका केली आहे.