
पश्चिम उपनगरासाठी असलेल्या मेट्रो-2 (Metro Line 2A) आणि मेट्रो-7 (Metro Line 7) या आता चाचणीसाठी सज्ज झाल्या आहेत. या दोन्ही मेट्रोची चाचणी सोमवारी केली जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही मेट्रो लाइन येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रवाशांच्या सेवेत हजर होत आहेत. या मेट्रो लाइनसाठी अंतिम टप्प्यातील कामे झपाट्याने पूर्ण करण्यावर आता भर दिला जाणार आहे. या दोन्ही मेट्रो लाइन सुरू झाल्यानंतर तब्बल 13 प्रवाशांना याचा फायदा मिळणार आहे.
मुंबई मेट्रोची प्रत्येक ट्रेन ही 6 कोचची ट्रेन आहे. प्रत्येक कोचमध्ये 52 प्रवाशांना बसण्याची आणि 328 प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची सोय आहे. त्यानुसार, मेट्रोच्या एका डब्यातून 380 जणांना प्रवास करता येणार आहे. तसेच एकावेळी 2 हजारांहून अधिक प्रवास करता येणार आहे. या दोन्ही मेट्रो प्रकल्पाच्या कामाला 5 वर्षे पूर्ण झाले आहेत. या दोन्ही मेट्रो लाइन सुरू झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर या पट्ट्यातील 13 लाख प्रवाशांना त्याचा फायदा मिळणार आहे. मेट्रोची ही सुविधा सुरु झाल्यानंतर रस्त्यामार्गे प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईत आज कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी घट; 1000 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
करोनामुळे ‘मेट्रो 2-ए’ आणि ‘मेट्रो- 7’ या दोन मार्गिकांच्या कामास विलंब झाला होता. पूर्वीच्या नियोजनानुसार डिसेंबर 2020 पर्यंत या दोन्ही मार्गिका सुरू करण्यात येणार होत्या. मात्र टाळेबंदीमुळे परप्रांतीय मजूर मूळ गावी गेल्याने प्रकल्पाचे काम रखडले होते. तसेच मेट्रो गाडीच्या डब्यांसाठी परदेशातून काही सुट्टे भाग आयात करावे लागतात. ते मिळविण्यात विलंब झाला होता.