MLC Polls 2021: विधान परिषदेच्या मुंबई  जागेवर Rajhans Singh यांना BJP कडून मिळालेली आमदारकी पक्षाला आगामी बीएमसी निवडणूकीत उत्तर भारतीयांची मतं आकर्षित करायला मदत करणार?
Rajhans Singh | PC: Facebook

महाराष्ट्रामध्ये आज विधानपरिषद निवडणूकीची(MLC Polls) रणधुमाळी पहायला मिळाली. विधानपरिषदेच्या 6 पैकी 4 जागा बिनविरोध करण्यात आल्या. त्यापैकी मुंबई मध्ये एक जागा भाजपाची होती. भाजपाने मुंबई च्या जागेवर राजहंस सिंह (Rajhans Singh) यांना उमेदवारी दिली आणि आता त्यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड देखील झाली आहे. दरम्यान फेब्रुवारी 2022 च्या सुमारास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकांवर डोळा ठेवत भाजपाने राजहंस सिंह यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. राजहंस सिंह यांच्या माध्यमातून मुंबई उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवत ही खेळी खेळल्याचंही बोललं जात आहे.

मुंबईच्या सध्य स्थितीचा अंदाज घेता, मुंबई मध्ये 27% उत्तर भारतीय मतदार आहेत. त्यांचा आकडा अंदाजे 15 मिलियन आहे. 236 पैकी 184 वॉर्ड्समध्ये उत्तर भारतीय मतदारांचं प्रमाण 5 ते 53% आहे. तर 63 वॉर्ड्स मध्ये उत्तरभारतीयांचं प्रमाण 25% पेक्षा अधिक आहे. पूर्व उपनगर किंवा शहरापेक्षा पश्चिम उपनगरामध्ये उत्तर भारतीय मतदार अधिक आहे. सध्या भाजपाकडून सार्‍या मतदारांना खूष ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. MLC Polls 2021: महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीत 6 पैकी 4 जागा बिनविरोध; अकोला-वाशीम-बुलडाणा आणि नागपूर जागेवर चुरस रंगणार .

राजहंस सिंह हे 2019 पर्यंत कॉंग्रेस पक्षामध्ये होते. तीन टर्म ते नगरसेवक होते. 8 वर्ष बीएमसी मध्ये ते विरोधी पक्षाचे नेते होते. 2009 मध्ये दिंडोशी मधून ते आमदार म्हणून निवडून आले होते. लोकप्रिय असले तरीही त्यांचे पक्षातील सहकार्य कृपाशंकर सिंह यांच्याप्रमाणे कोणत्याही घोटाळ्यात नव्हते. महाराष्ट्रातील पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडून येणार्‍या सहा जागांसाठी पक्षाने शुक्रवारी जाहीर केलेल्या पाच उमेदवारांमध्ये सिंह यांचा समावेश होता. दोन आमदार बीएमसी नगरसेवक निवडून देतात.

मुंबई महानगरपालिकांमध्ये आता भाजपा सोबत शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता फारच कमी असल्याने भाजपाने आता कंबर कसायला सुरूवात केली आहे. भाजपाकडे सध्या 227 संख्याबळ असलेल्या बीएमसी मध्ये 82 जागा आहेत. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुढील महिन्यात भाजपा युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील मुंबई शहरात रॅली मध्ये समाविष्ट करून घेणार आहेत.