Moving Mixer Truck Catches Fire (PC - Twitter/ANI)

Moving Mixer Truck Catches Fire: मुंबईतील (Mumbai) बोरिवली वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर (Borivali Western Express Highway) एका चालत्या मिक्सर ट्रकला (Moving Mixer Truck) रविवारी रात्री आग (Fire) लागली. या आगीत ट्रक चालक जखमी झाला. एक्सप्रेस हायवेवरील देवीपाडा मेट्रो स्थानकाजवळ (Devipada Metro Station) ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच कस्तुरबा पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.

मात्र, ही आग कधी विझवण्यात आली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात रस्त्याच्या कडेला ट्रकला आग लागल्याचं दिसत आहे. (हेही वाचा - BEST Bus Catches Fire: नागपाडा सिग्नलवर जेजे हॉस्पिटलजवळ बेस्ट बसला आग; पहा व्हिडिओ)

मिक्सर ट्रकला आग लागल्याचा व्हिडिओ -   

दरम्यान, शनिवारी सकाळी दक्षिण मुंबईत बेस्टच्या बसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ही आग अवघ्या 10 मिनिटांत विझवण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. बीएमसीने शेअर केलेल्या माहितीनुसार, नागपाडा सिग्नलजवळ ही घटना सकाळी 8.20 वाजता घडली. बसला आग लागल्याचे आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करतानाचे दृश्य सोशल मीडियावर समोर आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. कारण बस आग लागण्यापूर्वीच रिकामी करण्यात आली होती.

बेस्ट बसला आग - 

बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या उजव्या टायरजवळ आग लागली तेव्हा बसमध्ये चालक आणि वाहक उपस्थित होते. ही बस 'वेट लीज ऑपरेटर' मातेश्वरी गटाची होती आणि ती सांताक्रूझ (पश्चिम) ते इलेक्ट्रिक हाउस डेपो दरम्यान धावणाऱ्या सी-1 मार्गावर चालत होती.

तथापी, बसमधील कर्मचार्‍यांनी अग्निशमन दलाला अलर्ट केले आणि 10 मिनिटांत आग आटोक्यात आली. बसला अचानक लागलेल्या आगीचे काही दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.