Pankaja Munde, Dhananjay Munde (PC - Facebook)

बीड (Beed) जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या  राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि त्यांचे चुलत भाऊ राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी या भागातील विकास कामांवरून एकमेकांवर निशाणा साधला. एका जाहीर सभेत बोलताना धनंजय म्हणाले, निवडणुका तोंडावर आल्यावर त्यांना अचानक ऊसतोड कामगारांच्या (Sugarcane workers) हिताची आठवण होते. पंकजा यांनी 12 डिसेंबरला माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंतीदिनी ऊसतोड कामगारांसोबत एक दिवस घालवल्याचा उल्लेख त्यांनी केला होता.

2014 ते 2019 या काळात महाराष्ट्रात भाजप सरकारच्या कार्यकाळाचा संदर्भ देत धनंजय म्हणाले, पंकजा कॅबिनेट मंत्री होत्या. मात्र सरकारने ऊस कामगारांच्या मदतीसाठी काहीही केले नाही. 2014 मध्ये भाजपने ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात हे महामंडळ दोनदा विसर्जित करण्यात आले. एमव्हीए सरकार सत्तेवर आल्यानंतर मी महामंडळाची स्थापना केली. ते कामगार विभागाकडे होते. मी ते समाजकल्याण आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत आणले आहे.

बीड जिल्ह्याला लागलेल्या मागासलेपणाबद्दल चिंता व्यक्त करून मंत्री म्हणाले, आम्हाला प्रश्न विचारणारे आता सत्तेत असताना जिल्ह्याचा विकास करण्यात अपयशी ठरले आहेत. दरम्यान आष्टी येथील जाहीर सभेत पंकजा यांनी बीडमधील विकासाअभावी आणि ऊसतोडणी कामगारांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल धनंजय यांच्यावर निशाणा साधला. हेही वाचा Gulabrao Patil Statement: रस्त्यांची तुलना मंत्री गुलाबराव पाटीलांनी केली भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी, वक्तव्यावर भाजप आक्रमक

मी कॅबिनेट मंत्री असताना ग्रामीण रस्ते विकासासाठी मोठा निधी दिला होता. दुर्दैवाने गेल्या दोन वर्षांत एमव्हीए सरकारने काहीही केले नाही. बीडच्या विकासासाठी कोणतीही तरतूद केली नाही. 32 जिल्ह्यांतील 105 नगर पंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.