Pune Accident: वरंधा घाटात मिनी बस दरीत कोसळली, चार जण जखमी
Accident (PC - File Photo)

Pune Accident: भोर- महाड मार्गावर वरंधा घाटात मिनी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जण जखमी झाले आहे.पुणे स्वारगेटहून भोरमार्गे महाड- चिपळूकडे जाणाऱ्या 17 सिटर मिनी बसचा अपघात झाला आहे. बस ही थेट दरीत कोसळली.या अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दोन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चालकाचा रस्त्याचा अंदाज न आल्याने बस थेट दरीत कोसळली.  दरीत किमान 50 ते 60 खोल खाली कोसळली. कोसळल्यानंतर धरणाच्या पाण्यापासून पाच फुट अलीकडे गाडी अकडून पडली आणि त्याच मुळे मोठी दुर्घटना टळली.

मीडिया रिपोर्टनुसार, गाडीत चालकासह दहा ते अकरा प्रवासी होते. या घटनेत बसचालकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.बस चालकाला रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने बस थेट दरीत कोसळली. दरी किमान 50 ते 60 फुट खोल होती. गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्तीचे काम सुरु आहे. या घटनेत तीन ते चार प्रवाशी जखमी झाले आहे. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनचालकाने अपघातग्रस्त स्थळापासून जवळच असलेल्या सह्याद्री हॉटेल मालकाला या अपघाताची माहिती दिली. गाडीत चालकासह दहा ते अकरा प्रवासी होते. त्यातील तीन ते चार जण जखमी झालेत. बाकी काही प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.