Sambhajinagar Accident: संभाजीनगरमधल्या भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू, गाडी चालक घटनास्थळावरून फरार
भरधाव दुचाकीवरून विरुद्ध दिशेने ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघा मित्रांच्या अज्ञात बोलेरो गाडीची जोरदार धडक
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात पुन्हा एकदा एक भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. भरधाव दुचाकीवरून विरुद्ध दिशेने ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघा मित्रांच्या अज्ञात बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात (Accident News) दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा भीषण अपघात जालना रोडवरील सुंदरवाडी परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमी व्यक्तीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Mumbai Andheri Landslide: मुंबईतील अंधेरी परिसरात इमारतीवर दरड कोसळली, कोणतेही जीवितहानी नाही)
या भीषण अपघातात विजय जगन्नाथ काकडे, अभिषेक राजू लोकल यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर उमेश उर्फ गुड्डू उमानंद कत्तिकर यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांना घाटी रुग्णालयात हजेरी लावली आहे.
रविवारी अभिषेक हा कंपनीत काम करून आला. त्यानंतर विजय, अभिषेक, उमेश हे तिघे दुचाकीवरुन जालना रोडवर सुंदरवाडी येथील ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले. दरम्यान, जेवणानंतर तिघेही घराकडे निघाले. तेथून दुचाकीवरून विरुद्ध दिशेने जात असताना झाल्टा फाट्यावर अज्ञात बोलेरोने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बोलेरो चालक घटनास्थळावरून पसार झाला. जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असतात दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2023 09:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

