Building Wall Collapsed प्रतिकात्मक प्रतिमा (PC - ANI/Twitter)

Mumbai Andheri Landslide: मुसळधार पावसाने राज्यभरात थैमान माजवले आहे. ठिकठिकाणी पूर, दरड कोसळल्याची घटना समोर येत आहे. रायगड  जिल्ह्याच्या इर्शाळवाडी (Irshalwadi) दरड दुर्घटना, आणि काल रात्री मुंबई पुणे एक्सप्रेसवर दरड कोसळलेली घटना ताजी असताना मुंबईतील (MumbaI) अंधेरी पूर्व चकाला (Chakala) परिसरात रामबाग सोसायटी मध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.  सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रात्रीच्या 2 च्या सुमारास घडली आहे. मध्य रात्री नागरिक सर्व झोपेत असताना ही दरड कोसळल्याची घटना घडली. रामबाग सोसायटी च्या बाजूला असलेला डोंगरामधून सोसायटीचा पहिला मजल्यावर चार ते पाच फ्लॅटमध्ये डोंगराच्या ढिगारा गेला. परिसरात मध्य रात्रीच गोंधळ सुरु झाला. या दुर्घटनेमुळे सर्वांच्या झोपा उडल्या.

डोंगरामधून सोसायटीचा पहिला मजल्यावर चार ते पाच फ्लॅटमध्ये डोंगराचा ढिगारा गेला आहे. या घटनेतून कोणतेही जीवित हानी झालेले नाही. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. परंतू इमारतीमधील फ्लॅटचे नुकसान झाले आहे. पाच ते सहा घरांचे संसार उध्दवस्त झाले आहे.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी ही घटना घडताच अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावले. अग्निशमन दल्याच्या दोन गाड्या येथे दाखल झाले. जवळील पोलिस ठाण्यातील पोलिसांनी देखली घटनास्थळी धाव घेतला.

परिसरातील नागरिकांच्या मनात मोठा भय निर्माण झाला आहे. सद्या या घटनेवर बचावकार्य काम करत आहे. पोलिसही मदतीला घटनास्थळी आहेत. दरड ढिगारा काढण्याचे काम चालू आहेत. काल रात्री मुंबईत मुसळधार पाऊस असल्याने ही घटना झाली. ही घटना रात्रीच्या २ च्या सुमारास घडली आहे.