Tejas Thackeray | PC: Instagram

शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुटुंबातील शेंडेफळ तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. हेच औचित्य साधत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मध्ये शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी तेजसला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याचीच सकाळपासून चर्चा सुरू झाली आहे. मिलिंद नार्वेकरांनी तेजसची तुलना क्रिकेटपटू Vivian Richards सोबत केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. या जाहिराती मागे तेजस ठाकरेंच्या देखील राजकीय प्रवेशाचे संकेत आहेत का? याची चर्चा आता जोर धरायला लागली आहे. मात्र मीडीयाशी बोलताना त्यांनी ही शक्यता सध्या फेटळली आहे.

2019 विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदा आदित्य ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात उतरले. नंतर राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी काही महिन्यातच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आता तेजसही राजकारणात येणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या आदित्य ठाकरेंकडे कॅबिनेट मंत्रीपदाचा भार असल्याने युवासेना अध्यक्ष पदाची त्यांच्याकडील जबाबदारी अन्य कोणाकडे जाण्याची देखील चर्चा आहे. त्यांचे मावसभाऊ वरूण सरदेसाई यांचं नाव त्यासाठी चर्चेत आहे पण अशावेळीच तेजस कडे देखील ही जबाबदारी जाऊ शकते असे अंदाज बांधायला सुरूवात झाली आहे.

क्रिकेटचं मैदान आपाल्या दमदार कामगिरीने गाजवणार्‍या Vivian Richards प्रमाणेच तेजस ठाकरे रोखठोक आहेत. त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यामुळे त्यांची राजकारणात एंट्री होऊ शकते असे राजकीय विश्लेषक अंदाज बांधत आहेत. पण मिलिंद नार्वेकरांनी आजची सामनातील जाहिरात त्यांच्या कौटुंबिक संबंधातून दिल्याचं स्पष्ट करत तूर्तास चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

सामनातील जाहिरात

तेजस ठाकरे बर्थ डे जाहिरात ।PC: Twitter

संध्या दोशी ट्वीट  

 

View this post on Instagram

 

A post shared by Sandhya Doshi (@doshi_sandhya)

दरम्यान तेजस ठाकरे हा Wildlife photographer आणि Naturalist म्हणून काम करत आहे. त्याने Thackeray Wildlife Foundation ची स्थापना केली आहे. अनेक वन्यजीवांच्या प्रजातींचा त्याने शोध लावला आहे. पण आता त्यासोबतीने तो शिवसेने मध्ये सक्रिय सहभाग घेणार का? हे पहावं लागणार आहे. काही महत्त्वाच्या प्रसंगी तेजस ठाकरे राजकीय सभांना व्यासपीठावर दिसले आहेत. प्रचारसभांना दिसले आहेत.