MHT CET Result 2020 यंदा 28 नोव्हेंबर पर्यंत जाहीर होण्याची शक्यता; जाणून घ्या यंदाच्या सीईटी निकाला विषयी काही महत्त्वाच्या अपडेट्स
MHT CET 2020 (PC - Pixabay)

यंदा कोरोना संकटाच्या काळात पार पडलेल्या महाराष्ट्र सीईटी परीक्षेच्या निकालाकडे आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान Maharashtra State CET Cell कडून MHT CET 2020 result यंदा 28 नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन cetcell.mahacet.org, mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. यासाठी त्यांच्याकडे लॉगिंग क्रेडिट्स असणं आवश्यक आहे. दरम्यान यावर्षीच्या निकालाबाबत, आंसर की, गुणपद्धतीबद्दल काही महत्त्वाचे अपडेट्स देण्यात आले आहेत. त्यामुळे याबद्दलची माहिती नक्की जाणून घ्या. MHT CET 2020 Result: एमएचटी सीईटी परीक्षांचे निकाल 28 नोव्हेंबरपर्यंत लागण्याची शक्यता; cetcell.mahacet.org वर पहा गुण.

MHT CET Result 2020 बद्दलचे काही महत्त्वाचे अपडेट्स

  • MHT CET 2020 निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे login ID आणि password असणं आवश्यक आहे.
  • 1 ते 20 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या परीक्षेमध्ये यंदा सुमारे 4 लाख विद्यार्थी MHT CET exam ला सामोरे गेले आहेत. मुंबईत कोसळलेला पाऊस आणि अचानक बत्तीगुल झाल्याने झालेला गोंधळ यामुळे काही विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलकडून पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती.
  • यंदाचा सीईटी निकाल जाहीर झाल्यानंतर सेलकडून MHT CET counselling process सुरू होणार आहे. ही 3 टप्प्यांमध्ये असेल. तसेच अधिकचा स्पॉट राऊंडदेखील होईल.
  • यंदाच्या सीईटी परीक्षेमध्ये 23 प्रश्न चूकीचे होते. त्यामुळे हे 23 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या परीक्षार्थींना त्याचे मार्क्स दिले जाणार आहेत.
  • 10 नोव्हेंबरला सीईटी सेलने MHT CET answer key 2020 जारी केली होती.
  • 791 विद्यार्थ्यांनी प्रश्न-उत्तरांबद्दल आपल्या हरकती नोंदवल्या होत्या. त्यापैकी 65 हरकती योग्य असल्याचे समोर आले आले.

MHT-CET ही परीक्षा दरवर्षी महाराष्ट्र सरकार कडून घेतली जाते. त्यासाठी Directorate of Technical Education विभाग परीक्षांचे नियोजन करते. या परीक्षांच्या निकालावरून अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनियरिंग आणि फार्मसी सारख्या महत्त्वाच्या शाखांमधील पदवीचे प्रवेश राज्यभर दिले जातात.